Saturday, October 11, 2008

बरड...

रात्र अर्धी निघून गेली. अर्धी अडकून पडली. मी म्हणालो या नद्या कुणी आणून सोडल्यात इथे. तर रात्र नुसतीच हिरमुसून कुठेतरी शून्यात बघत बसली. या रात्रिंचा हिशेब ठेवला पाहिजे.किती निघून गेल्यात अस्वस्थतेत, किती अडकून पडल्यात कोपर्‍यावर उभ्या कडूनिंबात. या झाडांची पाने, रात्र रात्र स्तब्ध असतात. देव जाणे कुणाच्या दु:खात खंतावत बसतात या सावल्या.आपण कुठल्यातरी अनामिक इच्छेचे टोक धरून निसटू पाहतो या विशाल जालातून, तर घोंघाऊ लागतात निनावी वारे ....